VIDEO- शिक्षण मंत्र्याला राष्ट्रगीतही म्हणता येईना; विरोधकांनी घेतली शाळा

  Bihar new education, sanjay nirupam, national anthem
Bihar new education, sanjay nirupam, national anthem

बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या नितीश सरकारवर (Nitish Government)  विरोधकांनी तोफ डागण्यास सुरुवात केलीय. नव्या सरकारमधील शिक्षण मंत्री  मेवालाल चौधरी (Mewalal Chaudhary) यांच्या नियुक्तीवर आरजेडीने राज्य सरकार निशाणा साधल्यानंतर आता महाराष्ट्रातूनही त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले आहेत.  काँग्रेस नेता संजय निरुपम यांनी चौधरी यांचा एक व्हिडिओ शेअर करुन ते नव नियुक्त पदासाठी अयोग्य असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. 

 निरुपम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. बिहारचे नव्या शिक्षण मंत्र्यांना राष्ट्रगीतही येत नाही, असे सांगत त्यांनी चौधरी यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, हे बिहारचे नवे शिक्षण मंत्री आहेत. त्यांना राष्ट्रगीतही पाठ नाही. यापूर्वी ते भागलपूर कृषी विद्यालयाचे कुलपती होते. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप यांच्यावर आहेत, असा दावा निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय.  

बिहारमधील निवडणुकीच्या प्रचारावेळी देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रीय जनता दलाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला होता.  चौधरी यांच्याकडे शैक्षणिक जबाबदारी दिल्यानंतर आता हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. चौधरी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.   

चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी देखील चौधरी यांच्या खांद्यावरुन नितीश सरकारव हल्लाबोल केलाय. तेजस्वी यादव यांनी 10 लाख रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. दुसरीकडे नितिश कुमार सरकारने पहिल्याच कॅबिनेटमध्ये नियुक्ती घोटाळ्यातील व्यक्तीला मंत्री केले, असा टोला लालू प्रसाद यांच्या ट्विटवरुन बिहारमधील राज्य सरकारला लगावण्यात आलाय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com