भारताच्या वाघचं नेपाळच्या वाघिणीवर जडलं 'प्रेम'; प्रणयक्रीडेत अडथळा ठरणाऱ्या बछड्याचा काढला काटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Valmiki Tiger Reserve Bihar

'प्रेम' कोणाला काहीही करायला लावू शकतं. हे केवळ मानवांनाच लागू होत नाही, तर प्राण्यांनाही लागू होतं.

वाघानं प्रणयक्रीडेत अडथळा ठरणाऱ्या बछड्याचा काढला काटा

'प्रेम' (Love) कोणाला काहीही करायला लावू शकतं. हे केवळ मानवांनाच लागू होत नाही, तर प्राण्यांनाही लागू होतं. बिहारच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात (Valmiki Tiger Reserve Bihar) प्रेमाचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. एका वाघानं (Tiger) नेपाळमधील (Nepal) वाघिणीच्या प्रेमात पडून आठ महिन्यांच्या मादी पिल्लाला ठार मारलंय. दोघांच्या प्रेमात हे पिल्लू अडथळा ठरत होतं. याच कारणावरून वाघानं त्याला ठार केलं. बुधवारी व्याघ्र प्रकल्पात 8 महिन्यांच्या बछड्याचा मृतदेह सापडला.

बछड्याचा अचानक मृत्यू झाल्यानं वनविभागात (Forest Department Bihar) खळबळ उडालीय. वनविभागानं एक पथक तयार करून मृत्यूचं कारण शोधण्यास सुरुवात केलीय. यादरम्यान काळेश्वर मंदिराच्या (Kaleshwar Temple) कंपाऊंड क्रमांक टी 1 मध्ये पिल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सोनहा नदीच्या काठावर हा व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. सोनहा नदी भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांच्या सीमांना विभाजित करते.

हेही वाचा: सिनेमागृहात धुमाकूळ घालणाऱ्या 'पुष्पा'वर उदयनराजे फिदा

वाघ भारताचा, तर वाघिण नेपाळची आहे

वनसंरक्षक हेमकांत राय (Forest Conservator Hemkant Rai) यांनी सांगितलं की, 3 आणि 4 जानेवारी रोजी या भागाजवळ वाघिणीचं दर्शन झालं होतं. याबाबत अधिक माहिती घेतली असता, ती नेपाळची असल्याचं आढळून आलं. त्याचवेळी तिथं वाघही दिसला. वाघ भारतातील आहे. वाघ आणि वाघिण प्रणयक्रीडा करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, यात मादीचं पिल्लू अडथळा ठरत होतं, त्यामुळं वाघानं या बछड्याला ठार मारलं. या पिल्लाचं वय सुमारे 8 महिने होतं. त्याचे दुधाचे दातही अजून तुटले नव्हते.

हेही वाचा: 'या दोन पंतप्रधानांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळं देशाचं मोठं नुकसान झालंय'

याआधी 2021 मध्ये तीन वाघांचा मृत्यू

व्याघ्र प्रकल्पात 43 प्रौढ आणि 7 शावक वाघ शिल्लक आहेत. 31 जानेवारी 2021 रोजी व्हीटीआरच्या (VTR) गोबरधन वन परिक्षेत्रातील (Gobardhana Forest) सिरिसिया वनक्षेत्राजवळ वाघाचा मृतदेह सापडला होता. यामध्ये वर्चस्वाच्या लढाईत एका वाघानं दुसऱ्या वाघाचा बळी घेतला होता. यानंतर, 13 ऑक्टोबर 2021 रोजी व्हीटीआरच्या मंगुराहा रेंजमध्ये वाघाचा मृतदेह आढळून आला. दोन वाघांच्या आपसी भांडणातून हा मृत्यू झाला. तर, 12 डिसेंबर 2021 रोजी एका वाघिणीचा मृत्यू झाला. व्हीटीआरच्या चकरसन मानपूर येथील शेतात वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या वाघिणीचं वय सुमारे 10 वर्षे असून ती दोनदा गर्भवतीही झाली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bihartiger
loading image
go to top