Nitish Kumar Announcement : बिहार निवडणुकीआधी नितीश कुमारांनी टाकला मोठा डाव; विरोधकांचं वाढणार टेन्शन?

Nitish Kumar’s Strategic Announcement Ahead of Bihar Elections : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे अन् मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले.
Chief Minister Nitish Kumar announces 35% reservation for women in Bihar government jobs and launches Bihar Youth Commission ahead of assembly elections.
Chief Minister Nitish Kumar announces 35% reservation for women in Bihar government jobs and launches Bihar Youth Commission ahead of assembly elections. esakal
Updated on

Nitesh Kumar and Bihar Vidhansabha Election : बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यीतल राजकीय वातावरण हळूहळू तापत आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि आघाड्यांनी कंबर कसली आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा डाव खेळत, महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. अन्य राज्यांमधील निवडणुकीचा इतिहास बघता, निवडणुकीत गेमचेंजर ठरणाऱ्या महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी नितीश कुमार सरकारने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

नितीश सरकारने महिला आरक्षणाची घोषणा केली आहे. त्यांनी घोषणा केली की बिहारमधील महिलांना राज्यातील सर्व स्तरांवर प्रत्येक सरकारी सेवा, संवर्ग आणि थेट नियुक्तीमध्ये ३५ टक्के आरक्षण दिले जाईल. तसेच, हा नियम प्रत्येक प्रकारच्या सरकारी नोकरीवर लागू होईल.

याशिवाय, नितीश कुमार यांनी बिहार युवा आयोगाची स्थापना करण्याची घोषणा देखील केली आहे. X वर पोस्ट करत त्यांनी लिहिले आहे की, मला हे सांगण्यास आनंद होत आहे की बिहारमधील तरुणांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी मिळतील. त्यांना प्रशिक्षित आणि सक्षम करण्यासाठी राज्य सरकार बिहार युवा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे. बिहार युवा आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Chief Minister Nitish Kumar announces 35% reservation for women in Bihar government jobs and launches Bihar Youth Commission ahead of assembly elections.
Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

याशिवाय, ते म्हणाले की, समाजातील तरुणांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि उन्नत करण्यासाठी सरकारला सल्ला देण्यात हा आयोग महत्त्वाची भूमिका बजावेल. तरुणांसाठी चांगले शिक्षण आणि रोजगार सुनिश्चित करण्यासाठी हा आयोग सरकारी विभागांशी समन्वय साधेल. तसेच, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढे लिहिले आहे की, बिहार युवा आयोगात एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष आणि सात सदस्य असतील, त्यांचे कमाल वय ४५ वर्षे असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com