११ वेळा कोरोनाची लस घेणं भोवलं! वृद्धाविरोधात गुन्हा दाखल

Man Booked for 11 Jab of Covid
Man Booked for 11 Jab of Covide sakal

पाटना : बिहारमधील एका वृद्धाने तब्बल ११ वेळा कोरोनाची लस (Corona Vaccination) घेतली. वेगवेगळे ओळखपत्र दाखवून प्रशासनाची फसवणूक केल्यामुळे त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रह्मदेव मंडल असे या वृद्धाचे नाव आहे.

ब्रह्मदेव मंडळ हे निवृत्त पोस्टमास्टर असून त्यांनी ११ वेळ कोरोनाची लस घेतल्याचा दावा केली होता. त्यांनी कोरोनाचा पहिला डोस गेल्या वर्षी १३ फेब्रुवारीला घेतला. त्यानंतर यंदा १३ मार्चला शेवटचा डोस पुरैनी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतला. १२ व्यांदा लस घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश मिळू शकले नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर गुडघेदुखी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. गुडघेदुखीतून कायमची सुटका मिळावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून लसी घेतल्या.

ब्रह्मदेव यांच्या दाव्यानंतर आरोग्य प्रशासन खळबळून जागे झाले. पुरैनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुरैनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकारी दीपक चंद्र दास यांनी सांगितलं.

या दिवशी घेतल्या लसी

  • पहिली लस - १३ फेब्रुवारी रोजी जुन्या पीएचसीमध्ये

  • दुसरी लस - १३ मार्च रोजी जुन्या पीएचसीमध्ये

  • तिसरी लस - १९ मे रोजी औरई उपआरोग्य केंद्र

  • चौथी लस - १६ जून रोजी कोटा येथील भूपेंद्र भगत यांच्या कॅम्पमध्ये

  • पाचवी लस - २४ जुलै रोजी जुनी बडी हाट शाळेतील शिबिर

  • सहावी लस - ३१ ऑगस्ट रोजी नाथबाबा स्थान शिबिर

  • सातवी लस - ११ सप्टेंबर रोजी बडी हाट शाळेत

  • आठवी लस - २२ सप्टेंबर रोजी बडी हाट शाळेत

  • नववी लस - २४ सप्टेंबर रोजी उपकेंद्र कलासन

  • दहावी लस - खगरिया जिल्ह्यातील परबट्टा

  • अकरावी लस - पुरैनी आरोग्य केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com