Bihar Political Crisis : बिहार सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची उच्चस्तरीय बैठक; अमित शाह यांच्यासह विनोद तावडे...

बिहारमध्ये सध्या राजकीय गदारोळ सुरु झालेला आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा हादरा बसणार आहे.
Union Minister Amit Shah
Union Minister Amit Shahesakal

Nitish Kumar Bihar News : बिहारमध्ये सध्या राजकीय गदारोळ सुरु झालेला आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा हादरा बसणार असून त्यानिमित्ताने भाजप पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हं निर्माण झालीत.

भाजपमध्येही मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमध्ये पक्षाची एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. रात्री उशिरा ही बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि इतर नेत्यांची उपस्थिती आहे. तसेच बीएल संतोष, विनोद तावडे हेदेखील बैठकीला हजर आहेत.

Union Minister Amit Shah
Soha Ali Khan: प्रजासत्ताकदिनी सोहा अली खानच्या मुलीचं 'संविधान', व्यक्त केल्या इच्छा

केवळ दिल्लीतच नाहीतर बिहारमध्येदेखील बैठकांवर बैठका सुरु आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आमदारदेखील सहभागी होणार आहेत. जर लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीचा विचार केला तर तिथेही बैठकांचा सपाटा सुरुच आहे.

भाजपच्या जवळचे आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे सुपुत्र संतोष कुमार सुमन यांनी सांगितलं की, बिहार सरकार एक ते दोन दिवसांमध्ये कोसळू शकतं. राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात राहणार नाही. नितीश कुमारांचं घराणेशाहीवरचं विधान काँग्रेस आणि राजद यांना उद्देशून होतं, असाही दावा त्यांनी केला.

Union Minister Amit Shah
Khelo India : महाराष्ट्राच्या इशा-पार्थ जोडीचा सुवर्ण वेध; नेमबाजीच्या मिश्र दुहेरीत हरियाणाचा धुव्वा

विनोद तावडेंकडे महत्त्वाची जबाबदारी

भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्याकडे बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय गदारोळात तावडेंची भूमिका महत्त्वाची समजली जातेय. त्यामुळे ते पाटण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दि. २७ आणि २८ जानेवारी रोजी राज्य कार्यकारिणीची एक बैठक बोलावण्यात आलेली असून तावडे शनिवारी पाटण्यामध्ये असणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com