
बिहारमध्ये राजकीय खळबळ; ७२ तास आमदार-खासदारांना पटना सोडण्यास बंदी
बिहारच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बाजूला लालू प्रसाद यादवांचं राष्ट्रीय जनता दलाने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात युद्धच छेडलं. तर दुसऱ्या बाजूला भाजपासोबत युती करून सरकार चालवणारे नीतिश कुमार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. (Bihar Politics Chief Minister Nitish Kumar)
यामुळे आता बिहारच्या सत्ताकारणात बदल होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढचे ७२ तास बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या आमदारांशी सातत्याने चर्चा करत आहेत. भाजपासोबत युती करून सत्तेवर असतानाही त्यांनी पुढचे ७२ तास आपल्या सर्व नेते, आमदारांना पटनामधून बाहेर पडण्यास मनाई केली आहे.
हेही वाचा: सत्तेत राहून नितीश कुमार फक्त आपलं आयुष्य घालवताहेत : तेजस्वी यादव
नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे आता बिहारच्या राजकारण मोठा सत्ताबदल होणार का? नितीश कुमार भाजपापासून वेगळं होत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या विचारात आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण या प्रश्नांची उत्तरं आता ७२ तासांनंतरच मिळणार आहेत.
Web Title: Bihar Political Turmoil Nitish Kumar Ordered Mla To Not To Leave Patna In Next 72 Hours
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..