Bihar: फरार आरोपीसोबतच्या फोटोमुळे तेज प्रताप अडचणीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar

Bihar: फरार आरोपीसोबतच्या फोटोमुळे तेज प्रताप अडचणीत

बिहार मध्ये महागठबंधन बनल्या नंतर सरकार काहीना काही कारणाने वादात सापडत आहे. सरकारमधील पर्यावरण मंत्री तेज प्रताप सतत चर्चेत असतात.आता पुन्हा एकदा तेज प्रताप यांच्या सोबत फरार असलेल्या आरोपीचा फोटो वायरल आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

तेज प्रताप यांना मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद देखील देण्यात आले आहे. 19 ऑगस्टला जिल्हा स्थापना दिवस कार्यक्रमात ते उपस्थित राहिले होते. त्यावेळी फरार असलेल्या आरोपीने तेज प्रताप यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. एवढंच नाही तर तिथे DM आणि SP देखील उपस्थित होते. तरीही फरार असलेला आरोपीने पालकमंत्र्याचं पोलिसानं समोर स्वागत करून तेज प्रताप त्यांच्या सोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला.

हेही वाचा: तुमच्या व्हॉट्सअॅप चॅटवर सरकारची? करडी नजर; जाणून घ्या सत्य

तो आरोपी रोहाई पंचायत समिती सभापती आहे, आणि त्याच्यावर सरकारी संपत्तीचे नुकसान करणे ,आणि पोलिसांना मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणि तो फरार असून देखील पोलीस त्याला कशी सूट देऊ शकतात असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रोहई पंचायत सभापतीवर सरकारी संपत्तीचे नुकसान आणि पोलिसांना मारहाण आणि सरकारी कामात अडथळा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या सोबत 27 आरोपी देखील आहेत.

Web Title: Bihar Tej Pratap Criminal Pic Viral Nitish Kumar Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..