Tejashwi Yadav: प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरदार; सत्तेत आल्यास वीस दिवसांत कायदा करण्याचे तेजस्वींचे आश्वासन
Bihar Elections 2025: तेजस्वी यादव म्हणाले, सत्तेत आल्यास वीस दिवसांत राज्यात सरकारी नोकरीचा कायदा आणला जाईल आणि पुढील वीस महिन्यांत त्याची अंमलबजावणी होईल. शिवदीप लांडे यांनी बिहारमधील दोन जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली.
पाटणा : बिहारमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतर्गत बैठकांचे सत्र सुरू झाले असतानाच दुसरीकडे प्रमुख नेत्यांनी जनतेशी संवाद साधत आश्वासने देण्यास सुरुवात केली आहे.