
नवी दिल्ली - एड्स आजाराची लाज बाळगण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. तसेच एड्सग्रस्तांचा द्वेष न करू नये, असं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटलं. जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच तरुणांनी लाज न बाळगता तपासणी करून घेण्याचं आवाहन केलं. (bihar there is no need to be ashamed or afraid of aids youth should get tested says tejashwi yadav )
एड्सच्या रुग्णांचा द्वेष करू नये, तरुण पिढीने विशेषत: गर्भवती महिलांनी कोणतीही भीती व लज्जा न बाळगता एचआयव्हीची चाचणी करून घेणे आवश्यक असल्याचं तेजस्वी यांनी म्हटलं.
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यांनी या सोहळ्याचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. 'जागतिक एड्स दिनानिमित्त आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या जनजागृती मोर्चाच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.