

Jharkhand Foundation Day 2026 CM Hemant Soren Pays Tribute to Birsa Munda on His 151st Birth Anniversary Celebration
esakal
धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती आणि झारखंडचा २६ वा स्थापना दिवस रविवारी (१५ नोव्हेंबर २०२६) राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पत्नी आणि आमदार कल्पना सोरेन यांच्यासह रांचीतील कोकर येथील बिरसा मुंडा समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या ऐतिहासिक दिनानिमित्त राज्यातील सर्व २४ जिल्ह्यांमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ‘रन फॉर क्लीनलीनेस’ उपक्रमही राबवण्यात आला.