Bisleri : कलीयुगात सात हजार कोटींच्या प्रॉपर्टीवर पाणी फेरणारी ३७ वर्षांची मुलगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bisleri

Bisleri : कलीयुगात सात हजार कोटींच्या प्रॉपर्टीवर पाणी फेरणारी ३७ वर्षांची मुलगी

Bisleri Sale Deal : प्रवासात तहान भागवणारी बिस्लरी सर्वांनाच माहिती आहे. नुकतीच ही कंपनी विकण्याचा निर्णय कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी घेतला आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने रमेश यांनी या कंपनीची सूत्र हाताळली त्या पद्धतीने ती सांभाळणारे कुणीच नसल्याने त्यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

दरम्यान, रमेश यांच्या या निर्णयानंतर अनेकांना असे वाटू शकते की, चौहान यांना वारसदार नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असेल. पण असे अजिबात नाहीये. रमेश चौहान यांना एक मुलगी आहे. कलयुगात प्रॉपर्टीसाठी रक्ताच्या माणसांमध्ये वाद झालेले आपण पाहिले असतील. मात्र, चौहान यांची एकुलती एकमुलगी जयंती चौहान हिने आताच्या कलीयुगात चक्क थोडी थोडकी नव्हे तर, चक्क 7 हजार कोटींच्या मालमत्तेवर पाणी फेरलं आहे. जयंतीला वडिलांच्या व्यवसायात विशेष रस नसल्याने आपल्याला हा व्यवसाय विकावा लागत असल्याचे रमेश चौहान यांनी म्हटले आहे.

कोण आहेत जयंती चौहान?

बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान 37 वर्षांची आहे. जयंती चौहान यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर उपलब्ध माहितीनुसार, जयंती चौहान या बिस्लेरी इंटरनॅशनलच्या उपाध्यक्षा आहेत. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली होती. 2011 मध्ये त्यांनी बिस्लेरीच्या दिल्ली कार्यालय आणि नंतर मुंबई कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. बिस्लेरीला आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. जयंती या कंपनीची जाहिरात आणि मार्केटिंग विभाग सांभाळतात. विशेष म्हणजे जयंती यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीमध्ये ऑटोमेशन प्रक्रिया सुरू केली आहे.

ब्रँड सर्वदूर नेण्यात मोलाची भूमिका

बिस्लेरी ब्रँड सर्वदूर नेण्यात जयंती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीच्या जाहिरात मोहिमेव्यतिरिक्त, त्याचे लक्ष उत्पादन विकासावर असते. बिस्लेरी व्यतिरिक्त जयंती बिस्लेरी मिनरल वॉटर, वेदिका नॅचरल मिनरल वॉटर, फिजी फ्रूट ड्रिंक आणि बिसलेरी हँड प्युरिफायर उत्पादनांचे कामही सांभाळत आहेत. मार्केटिंग व्यतिरिक्त जयंती यांना ब्रँड मॅनेजमेंट आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये अधिक स्वारस्य आहे.

फॅशन डिझायनर आहेत जयंती

37 वर्षीय जयंती यांचे बालपण दिल्ली आणि मुंबईशिवाय न्यूयॉर्कमध्ये गेले आहे. जयंती यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी फॅशन डिझायनिंग कोर्ससाठी लंडन गाठले. लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून त्यांनी फॅशन डिझायनिंगमध्ये ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय जयंती यांनी इस्टिटूटो मॅरांगोनी मिलानोमधून फॅशन स्टायलिंगचा कोर्सही केला आहे.

लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमधून त्यांनी अरबीमध्ये पदवी घेतली आहे. जयंती सध्या लंडनमध्ये राहतात. बिस्लेरीच्या वेबसाइटवरी उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचे देशभरात 122 ऑपरेशनल प्लांट आणि 4,500 हून अधिक वितरकांचे नेटवर्क आहे.

जयंती यांनी का सोडलं ७ हजार कोटींची मालमत्ता?

वडिल रमेश चौहान यांच्या ७ हजार कोटींच्या कंपनीची जबबादारी स्वीकारण्यास नकाराबाबत स्पष्टता समोर आलेली नाही. परतु, जयंती यांना फॅशनशी संबंधित व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करायचे असल्याने त्यांनी ही जबबादारी न स्वीकारल्याची चर्चा आहे. दरम्यान, जयंती यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर प्रत्येक कथेच्या दोन बाजू असतात. अशी पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.