‘जनता मोदींनाच कौल देईल’ ; गृहमंत्री अमित शहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Home Minister Amit Shah politics

‘जनता मोदींनाच कौल देईल’ ; गृहमंत्री अमित शहा

पाटणा : ‘‘ कुटिल राजकारण करून कोणीही पंतप्रधान होऊ शकत नाही. २०२५ मध्ये होणारी विधानसभेची निवडणूक भाजपच जिंकेल, आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बिहारमधील जनता ही मोदींच्याच बाजूने कौल देईल,’’ असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल फुंकला.

मुस्लिमबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमांचलमधून आज शहा यांनी बिहार दौऱ्याला सुरूवात केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. लालू आणि नितीश यांची जोडी राज्यामध्ये जंगलराज आणू पाहते आहे, असा टोलाही शहा यांनी यावेळी बोलताना लगावला.

येथील रंगभूमी मैदानावर झालेल्या सभेत शहा यांनी कटिहार, किशनगंज, अररिया आणि पूर्णिया जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यात सत्तांतर झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. पाटण्यात नितीश- लालूंचे सरकार असले तरीसुद्धा दिल्लीमध्ये मात्र मोदींचे सरकार आहे.

नितीश यांनी भाजपच्या नाही तर राज्यातील जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. या धोक्याचा बदला बिहारमधील जनता घेईल. राज्यामध्ये भाजपचे सरकार आले तर आम्ही बिहारला विकसित राज्यांच्या पंक्तीमध्ये नेऊन ठेवू. नितीश हे विश्वास ठेवण्यायोग्य नेते नाहीत. ते जे काही बोलतात त्यावर कुणालाही विश्वास नसतो, असे शहा म्हणाले. यावेळी शहांनी भाजपने केलेल्या विकासकामांची उजळणीच केली.

Web Title: Bjp 2025 Assembly Elections Pm Narendra Modi Home Minister Amit Shah Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..