बिहारच्या विकासात भाजपही वाटेकरी; नितीश यांना श्रेय न जाऊ देण्याची खबरदारी

उज्ज्वल कुमार - सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 September 2020

बिहारमध्ये तीन दिवसांत ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक योजनांचे भूमिपूजन आणि उदघाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासाचे सारे श्रेय केवळ मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच जाऊ नये, याची खबरदारी घेतली.

पाटणा - बिहारमध्ये तीन दिवसांत ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक योजनांचे भूमिपूजन आणि उदघाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासाचे सारे श्रेय केवळ मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच जाऊ नये, याची खबरदारी घेतली.

पाटण्यात आज मोदी यांनी योजना पाटणा, मुजफ्फरपूर, मुंगेर व छपरातील ‘नमामि गंगे’शी संबंधित ५४३ कोटी रुपयांच्या योजनेचे उदघाटन मंगळवारी केले. पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम व्हर्चुअल होत आहे. आता येत्या १८, २१ व २३ या तारखांनाही त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांच्या विकास कामांचे उदघाटन ज्या वेगाने होत आहे, त्यावरून बिहारच्या विकासाचे श्रेय भाजप घेऊ पाहत आहे, हे अधोरेखित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लालू प्रसाद यादव यांच्या कुशासनाविरोधात नितीश कुमार यांनी दीर्घकाळ लढा दिला. बिहारच्या विकासाची दृष्टी फक्त नितीश कुमार यांच्याकडेच आहे.
- संजय सिंह, प्रवक्ते, संयुक्त जनता दल

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक प्रगती दूरच
भाजप सरकारने बिहारमध्ये योजनांच्या उदघाटनाचा धडाका लावला असला तरी अर्थशास्त्रज्ञ व ए. एन. सिन्हा इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डी. एम. दिवाकर यांनी टीका केली. ‘‘बिहारला ज्याप्रमाणात निधी हवा आहे, तेवढा मिळत नाही. २००५ पासून काही काळ सोडला तर बिहारमध्ये एनडीए सरकार सत्तेवर असले तरी राज्यात एकही विद्यापीठ सुरू होऊ शकले नाही. पाटणा विद्यापीठाला मध्यवर्ती विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणीही मोदी यांनी फेटाळली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP is also involved in the development of Bihar