esakal | भाजप, काँग्रेसला आता बंडखोरांची डोकेदुखी
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप, काँग्रेसला आता बंडखोरांची डोकेदुखी

सत्ताधारी भाजप आणि प्रमुख्य विरोध पक्ष असलेल्या कॉंग्रेससमोर बंडखोरीची डोकेदुखी निर्माण झाली आहे. या दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाजप, काँग्रेसला आता बंडखोरांची डोकेदुखी

sakal_logo
By
पीटीआय

चंडीगड : हरियानातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना सत्ताधारी भाजप आणि प्रमुख्य विरोध पक्ष असलेल्या कॉंग्रेससमोर बंडखोरीची डोकेदुखी निर्माण झाली आहे. या दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी (ता. 4) संपली. त्या वेळी रेवडीतील भाजपचे विद्यमान आमदार रणधीर कापरीवास यांना पक्षाने तिकीट नाकारले, त्यामुळे अपक्ष निवडणूक लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गुरगावचे भाजपचे आमदार उमेश आगरवाल यांनी त्यांच्या पत्नी अनिता यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते व दिवंगत माजी उपपंतप्रधान देवीलाल चौताला यांचे पुत्र रणजितसिंह चौताला यांनी अपक्ष म्हणून राणीया मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसने विनित कंबोज यांना तिकीट दिले आहे. याच प्रकारे अन्य मतदारसंघांतही बंडोखोरीचा सामना भाजप व कॉंग्रेसला करावा लागत आहे.