देशाच्या फाळणीवरुन काँग्रेस- भाजपा आमनेसामने; मोदींच्या ट्वीटवरुन वाद

देशाच्या फाळणीवरुन काँग्रेस- भाजपा आमनेसामने; मोदींच्या ट्वीटवरुन वाद

दोन राष्ट्राचे तत्व सावरकरांनी दिले

भारताच्या दुसर्‍या 'विभाजन विभीषिका स्मृति दिवस' निमित्त, भाजपने काँग्रेस पक्षावर निशाणा साधत एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये भाजपने 1947 च्या घटनांवर आपली आवृत्ती जारी केली आहे. सात मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये भारताच्या फाळणीसाठी जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरण्यात आले आहे. मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्माण करण्याच्या मागणीला बळी पडल्याचा ठपका नेहरूंवर ठेवण्यात आला आहे.

या व्हिडिओवरून काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, १४ ऑगस्ट हा फाळणी विभिषिका स्मृती दिन म्हणून साजरा करण्यामागील पंतप्रधानांचा खरा हेतू आपल्या राजकीय फायद्यासाठी अत्यंत वेदनादायक ऐतिहासिक घटनांचा वापर करणे हा आहे.

त्याचवेळी ते म्हणाले, 'आधुनिक काळातील सावरकर आणि जीनांचे देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेत.'

गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, 1947 च्या फाळणीदरम्यान भारतीयांनी भोगलेल्या दु:खाची आणि बलिदानाची देशाला आठवण करून देण्यासाठी दरवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी विभिषिका स्मृती दिन' म्हणून साजरा केला जाईल. रविवारी सकाळी पंतप्रधान मोदींनीही याबाबत ट्विट केले आहे.

भाजपचा व्हिडिओ Cyril John Radcliffe दाखवतो, ज्यांच्या विभाजनाचा नकाशा जवळपास पंजाब आणि बंगालला अर्ध्या भागात विभाजित करतो. यासोबतच भारतीय सांस्कृतिक वारशाची माहिती नसलेल्या व्यक्तीला अवघ्या काही आठवड्यात भारताचे विभाजन कसे होऊ दिले, असा प्रश्नही विचारण्यात आला. फाळणीची भीषणता सांगणाऱ्या व्हॉइस-ओव्हरसह नेहरूंचे व्हिज्युअल संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवले आहेत.

भाजपने हा व्हिडीओ ट्विट करून लिहिले की, 'ज्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा, सभ्यता, मूल्ये, तीर्थक्षेत्रांची माहिती नव्हती, त्यांनी अवघ्या तीन आठवड्यांत शतकानुशतके एकत्र राहणाऱ्या लोकांमधील सीमारेषा आखून दिली. या फुटीरतावादी शक्तींविरुद्ध लढण्याची जबाबदारी त्या वेळी कुठे होती?'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या व्हिडीओवर जोरदार प्रहार करत एकामागून एक ट्विट केले आणि ते म्हणाले की, सत्य हे आहे की दोन राष्ट्राचे तत्व सावरकरांनी दिले होते.

जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'सत्य हे आहे की सावरकरांनी दोन राष्ट्रांचे तत्त्व दिले आणि जीनांनी ते पुढे नेले. पटेल यांनी लिहिले, 'मला वाटते की फाळणी मान्य केली नाही तर भारताचे अनेक तुकडे होतील.'

त्याचवेळी त्यांनी विचारले आहे की, 'शरत चंद्र बोस यांच्या इच्छेविरुद्ध बंगालच्या फाळणीला पाठिंबा देणाऱ्या आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांचीही आज पंतप्रधानांना आठवण असेल का?'

फाळणीच्या शोकांतिकेचा दुरुपयोग द्वेष आणि पूर्वग्रह पसरवण्यासाठी होऊ नये. लाखो लोक बेघर झाले, अनेकांनी प्राण गमावले. त्यांचे बलिदान विसरता कामा नये किंवा त्यांचा अपमान होता कामा नये.

त्याचवेळी ते म्हणाले, 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गांधी, नेहरू, पटेल आणि इतर नेत्यांचा वारसा पुढे नेत देशाला एकसंध करण्याचा प्रयत्न सुरू ठेवेल. द्वेषाच्या राजकारणाचा पराभव होईल.

भाजपच्या व्हिडिओमध्ये फाळणीसाठी भारतीय कम्युनिस्टांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. भाजपचा दावा आहे की, त्यांच्या नेत्यांनी मुस्लिम लीगला पाठिंबा दिला आणि वेगळ्या मुस्लिम देशाच्या मागणीचे समर्थन केले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com