
Bhupendra Patel : भूपेंद्र पटेल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला विक्रमी यश मिळाल्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपल्या सर्व मंत्रिमंडळासह राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि पक्षाचे मुख्य प्रतोद पंकज देसाई यांच्यासह राजभवनावर जात भूपेंद्र पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत औपचारिकता पूर्ण केली.
पटेल यांच्याचकडे राज्याची धुरा राहणार असून १२ डिसेंबरला शपथविधी होणार आहे, असे भाजपने आधीच स्पष्ट केले आहे. राज्यपालांनी पटेल यांचा राजीनामा स्वीकारला असून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पटेल हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करतील, असे देसाई यांनी सांगितले. भाजपने उद्या (ता. १०) सकाळी दहा वाजता सर्व विजयी आमदारांची बैठक बोलाविली असून या बैठकीत नव्या नेत्याची निवड केली जाणार आहे, असेही पटेल यांनी राज्यपालांना कळविले आहे.