
भारतीय जनता पक्षाच्या लक्षद्वीप लोकसभा मतदार संघातील उमेदवाराला केवळ 125 मते मिळाली आहेत. अब्दुल खादीर हाजी असे या उमेदवाराचे नाव आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहम्मद फैजल हे 22851 मते घेत विजयी झाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हमीदुल्ला सय्यद यांना (एकूण मते- 22028) पडली आहेत.
Election Results: देशात मोदीलाट असताना भाजपच्या 'या' उमेदवाराला केवळ 125 मते
लोकसभा निकाल 2019
लक्षद्वीप : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल् 348 जागा मिळाल्या आहेत तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ 81 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.
या लाटेतही भारतीय जनता पक्षाच्या लक्षद्वीप लोकसभा मतदार संघातील उमेदवाराला केवळ 125 मते मिळाली आहेत. अब्दुल खादीर हाजी असे या उमेदवाराचे नाव आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहम्मद फैजल हे 22851 मते घेत विजयी झाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हमीदुल्ला सय्यद यांना (एकूण मते- 22028) पडली आहेत.
दरम्यान, लक्षद्वीप या मतदारसंघात एकूण सहा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यापैकी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अली अकबर यांना 143 मते पडली आहेत. तर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शरीफ खान यांना 420 मते पडली आहेत. तर जनता दलाच्या मोहम्मद सिद्धीकी यांना 1339 मते पडली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय या मतदारसंघात नोटालाही 99 मते मिळाली आहेत.
Web Title: Bjp Candidate Gets Only 125 Votes Despite Modi Wave
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..