गुजरातमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार; सूत्रांच्या हवाल्याने अरविंद केजरीवाल यांचा दावा

वेध विधानसभेचे : केजरीवाल गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले
BJP change state president Gujarat aap Arvind kejriwal cr patil
BJP change state president Gujarat aap Arvind kejriwal cr patil Sakal

अहमदाबाद : गुजरातमधील सत्ताधारी भाजपने आपल्या पक्षाच्या धास्तीमुळे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केला. केजरीवाल गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. वर्षअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी त्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. गुजरातमध्ये भाजपने दोन कॅबिनेट मंत्र्यांना हटविले आहे. राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडून महसूल, तर पुर्णेश मोदी यांच्याकडून रस्ते आणि इमारत हे खाते काढून घेण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी हे वक्तव्य केले.

सूत्रांचा उल्लेख करीत त्यांनी हा दावा केला होता. यावरून गुजरातचे भाजप प्रवक्ते ऋत्विज पटेल यांनी केजरीवाल यांचा दावा खोडून काढला. केजरीवाल यांचा `रेवडीलाल'', तर मनीष सिसोदिया यांचा ‘मद्य मंत्री‘ असा उल्लेख करून ते म्हणाले की, राजकारण आणि सार्वजनिक सेवा सूत्रांच्या हवाल्यानुसार करता येत नसते. त्याऐवजी तुम्ही स्वतःची आणि तुमच्या मद्य मंत्र्याची काळजी करावी.

केजरीवाल यांनी गुजरातमध्ये सत्ता मिळाल्यास मोफत सुविधा देण्याची घोषणा करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी त्यांनी गुजरातचे दौरे करण्याचा सपाटा लावला आहे. ऑगस्टमध्ये ते पाच वेळा गुजरातमध्ये आले आहेत. मोफत वीज, उद्योगपतींना धाडींपासून मुक्ती, बेरोजगारांना दरमहा तीन हजार रुपये भत्ता, दहा लाख सरकारी नोकऱ्या, १८ वर्षे वयावरील महिलांना दरमहा एक हजार रुपये अशा घोषणा त्यांनी केल्या आहेत.

भाजपचे प्रत्युत्तर

गुजरात भाजपचे प्रसिद्धी समन्वयक योगेश दवे यांनी केजरीवाल यांचा दावा तातडीने खोडून काढला. केजरीवाल यांना दिवास्वप्न बघण्याचा छंद जडला आहे. त्यांनी दिवास्वप्न बघणे थांबवावे, असा टोला त्यांनी लगावला. पाटील यांच्याविषयी विचार करण्याऐवजी केजरीवाल यांनी स्वतःवर लक्ष केंद्रित करावे, असा उपरोधक सल्ला त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com