
J. P. Nadda: भारतीय जनता पार्टीला (भाजप) प्रथमच महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकते, असे उच्च पदस्थ सूत्रांनी संकेत दिले आहेत. भाजप एका ऐतिहासिक बदलाच्या दिशेने वाटचाल करत असून, पक्षाच्या शीर्ष नेतृत्वामध्ये गेल्या काही काळापासून अनेक प्रमुख महिला नेत्यांच्या नावांवर विचारमंथन सुरू आहे. राजकीय वर्तुळात निर्मला सीतारामन, वनथी श्रीनिवासन आणि डी. पुरंदेश्वरी यांची नावे चर्चेत आहेत.