esakal | लाल किल्ल्यावर सरकारनेच आपली माणसं पाठवून हिंसा केली; काँग्रेसचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

adhir ranjan chaudhri

काँग्रेसने प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेमागे केंद्र सरकारचाच कट असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.

लाल किल्ल्यावर सरकारनेच आपली माणसं पाठवून हिंसा केली; काँग्रेसचा आरोप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसने प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेमागे केंद्र सरकारचाच कट असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. काँग्रसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय की, भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या वेषात आपल्याच लोकांना लाल किल्ल्यावर पाठवून हिंसा घडवून आणली होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी हिंसेच्या घटनेवर संयुक्त संसदीय समितीकडून तपास करण्याची मागणी केली. त्यांनी लाल किल्ल्याच्या घटनेचा उल्लेख करत म्हटलं की, वास्तव तर असं आहे की आपल्याला असं वाटतंच होतं की, असं काही घडावं जेणेकरुन लोकांचे लक्ष भटकवलं जाऊ शकेल. ही आपली विचारपूर्वक केलेली खेळी आहे. तुम्ही आपल्याच लोकांना शेतकऱ्यांच्या वेषात तिथं पाठवलं. जर याचा तपास झाला तर याच्या मागे सरकारच आहे हे बाहेर येईल. 

हेही वाचा : शेतकरी नेते पुन्हा चर्चेस तयार- टीकैत

हिंसेचा तपास करण्याची मागणी
त्यांनी विचारलं की, अमित शहांसारखा ताकदवान गृहमंत्री असताना काही लोक लाल किल्ल्यावर पोहोचलेच कसे? हाच मोठा प्रश्न आहे. याचा तपास होणार नाही का? प्रजासत्ताक दिनाला सर्वाधिक सुरक्षा राजधानी दिल्लीत असते. तर मग हे कसं घडलं? चौधरी यांनी पुढे सरकारवर शेतकऱ्यांच्या विरोधात छळाचा आणि बळाचा वापर केल्याचा आरोप केला.  त्यांनी म्हटलं की, तुम्ही मोठ्या चतुराईने शेतकरी नेत्यांनार आरोप दाखल केलेत. आपण छळाने नव्हे तर बळाने शेतकऱ्यांना दाबू इच्छिता.
सरकारला एवढा अहंकार का?
त्यांनी प्रश्न केला की, संसदेपासून काही किलोमीटर अंतरावरच हजारो शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलनासाठी बसले आहेत. 200  हून अधिक शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. पंतप्रधानांना शेतकऱ्यांशी बोलायला वेळ नाहीये का? एवढा अहंकार कशासाठी? शेतकऱ्यांची स्थिती दयनीय असल्याचं म्हणत त्यांनी सरकारला सुनावलं की, आपण बहुमताचा बळाने वापर करणे थांबवा. शेतकऱ्यांविरोधातील ही लढाई थांबवा.