धर्म संसदेला सरकारचा पाठींबा; प्रक्षोभक विधानानंतर ओवैसी संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi
धर्म संसदेला सरकारचा पाठींबा; प्रक्षोभक विधानानंतर ओवैसी संतापले

धर्म संसदेला सरकारचा पाठींबा; प्रक्षोभक विधानानंतर ओवैसी संतापले

धर्म संसदेतील (Dharm Sansad) द्वेषपूर्ण भाषणे उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील सरकारच्या सहकार्याने झाल्याचा गंभीर आरोप असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केला आहे. तसंच या प्रकरणात केवळ एफआयआर नोंदवणं पुरेसं नसून, दोषींनाही अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणाबाबतचे आदेश मागे घ्या

वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधानं करणाऱ्या अशा संघटनांवर युएपीए अंतर्गत बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ओवैसी यांनी केली. त्यांनी आरोप केला की, हरिद्वारच्या धर्म संसदेत "देशातील मुस्लिमांचा संहार करण्याचे आदेश दिले होते." समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या मुद्द्यावर ‘मौन’ बाळगल्याबद्दल विचारले असता, ओवैसी म्हणाले की, संविधान, कायदा आणि अराजकतेवर विश्वास न ठेवणाऱ्या देशातील सर्व राजकीय पक्षांनी मौन सोडलं पाहिजे.

हेही वाचा: आरोग्य निर्देशांकात ‘यूपी’ तळात

दरम्यान, या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, या द्वेषपूर्ण भाषणांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचंही नाव घेण्यात आलं. काँग्रेस आणि सपा या विषयांवर कधी बोलतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच आपल्या दुसऱ्या मतदारांना नाराज करायचं नाही हा त्यांचा हेतू, त्यांच्या मौन धारण करण्यावरून दिसून येतो असंही ओवैसी म्हणाले आहेत.

Web Title: Bjp Governments Support To Dharma Sansad Asaduddin Owaisi Got Angry After The Provocative Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Asaduddin Owaisi
go to top