
भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन, मोदी-शाहांसह १९ राज्यांचे मुख्यमंत्री करणार मोर्चेबांधणी
तेलंगाणातील हैदराबादमध्ये आजपासून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह १९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. (BJP Holds National Conference in Hyderabad)
हेही वाचा: भाजपच्या बैठकीपूर्वीच पंतप्रधान मोदी, अमित शहांना धमकी; एका नेत्याला अटक
संपूर्ण हैदराबादमध्ये पक्षाच्या मेगा शोच्या आधी भाजपचे झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. पोस्टर्समध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत मोदींची स्तुती करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक कोपरा भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या मोठमोठ्या कटआउट्स आणि बॅनरने सजलेला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठका त्यानंतर 2 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. 3 जुलै रोजी परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासह जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, पक्षाचा विस्तार हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असेल. पक्षाच्या अधिक कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची गरज असलेल्या पर्यायांवरही ते चर्चा करतील. 18 वर्षांनंतर, हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी शहर सजलं आहे. राष्ट्रीय नेते, मुख्यमंत्री आणि इतर नेते मतदारसंघांना भेट देत असल्याची माहिती तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष एन व्ही सुभाष यांनी सांगितलं.
Web Title: Bjp Holds National Executive Meeting In Hyderabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..