गांधी म्हणतात, 'भाजपने माझा आणि आईचा सन्मान केला'

वृत्तसंस्था
रविवार, 20 जानेवारी 2019

''मला नागरिकांचा इतिहास आणि भारतातील आंदोलनांवर पुस्तक लिहायचे होते. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्था हा महत्वाचा विषय आहे, असे मला देशाचा दौरा करताना लक्षात आले. त्यामुळे मी शैक्षणिक पुस्तक लिहिण्याऐवजी असे पुस्तक लिहिण्याची तयारी केली. जी लोकांच्या नेहमी कामास येईल''.

- वरुण गांधी, खासदार, भाजप

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने माझा आणि माझी आई मनेका गांधी यांचा कायम सन्मान केला आहे. त्यामुळे भाजपाबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही, असे भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी सांगितले. 

वरुण गांधी हे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरच्या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते म्हणाले, ''जेव्हा लोक कोणताही विचारही करत नसतात तेव्हा मी 29 व्या वर्षात पक्षाचा सरचिटणीस झालो. लोकांची सेवा करणे हा माझा उद्देश होता. 

वरुण गांधी यांनी त्यांचे नवे पुस्तक 'ए रूरल मॅनिफेस्टो: रिअलायझिंग इंडियाज फ्युचर थ्रू हर विलेजेस' याविषयीही माहिती दिली. त्यावर ते म्हणाले, की ''मला नागरिकांचा इतिहास आणि भारतातील आंदोलनांवर पुस्तक लिहायचे होते. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्था हा महत्वाचा विषय आहे, असे मला देशाचा दौरा करताना लक्षात आले. त्यामुळे मी शैक्षणिक पुस्तक लिहिण्याऐवजी असे पुस्तक लिहिण्याची तयारी केली. जी लोकांच्या नेहमी कामास येईल''.

Web Title: BJP honored me and my mother says BJP MP Varun Gandhi