भाजप लोकशाहीचा ‘सीरियल किलर’; अखिलेश यादवांचा हल्ला

Akhilesh Yadav
Akhilesh YadavAkhilesh Yadav

कन्नौज : पंचायत आणि विधान परिषद निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. सपा अध्यक्षांनी भाजपला लोकशाहीचा (democracy) सीरियल किलर म्हटले. महागाईवरही त्यांनी निशाणा साधला.

भाजप (BJP) लोकशाहीचा सीरियल किलर (serial killer) आहे. लोकशाहीत मतांची कशी लूट केली जाते, भाजप त्यात तज्ञ पक्ष बनला आहे. कन्नौजमधील अनेक साथीदार फॉर्म भरू शकले नाहीत. एटामध्ये पोलिस आणि डीएमने मिळून फॉर्म भरू दिला नाही. फर्रुखाबादच्या मित्रांसोबतही असेच घडले. भाजपकडून निष्पक्ष निवडणुकीची अपेक्षा करणे हा स्वतःचा विश्वासघात आहे. भाजपचे सरकार आल्यापासून बँकांचे व्याज सातत्याने कमी होत आहे. कानपूरमधील लॉकरमधून दागिने लुटले जात आहेत, असेही अखिलेश यादव (Akhilesh Yadav) म्हणाले.

Akhilesh Yadav
प्राध्यापकाने लिहिली हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार असल्याचे सांगितले होते. निवडणुकीनंतर तेच झाले. महागाईच्या प्रभावासोबतच बेरोजगारीलाही फटका बसत आहे. लोक आत्महत्या करीत आहेत. भाजपच्या (BJP) राजवटीत पत्रकारही सुरक्षित नाहीत. जर तुम्ही खरी बातमी चालवली तर ते तुम्हाला तुरुंगातही टाकतील. बलियामध्ये उत्तर प्रदेश बोर्डाचा पेपर फुटल्याचा खुलासा करणाऱ्या पत्रकाराला अटक झाली. हे अत्यंत निंदनीय वर्तन आहे, असेही अखिलेश यादव (Akhilesh Yadav) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com