BJP: मुस्लिम तरुणासोबत होणार होतं भाजप नेत्याच्या मुलीचं लग्न; पण...

लग्नाची पत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली. पण
BJP
BJP

भाजप नेत्याच्या मुलीचा एका मुस्लीम तरुणाशी लग्न होणार होतं. लग्नाची पत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली. पण नेटकऱ्यांसह नेत्यांचा संताप पाहता होणार लग्न मोडलं. मुलीच्या आनंदासाठी मुस्लिम तरुणाशी लग्न करण्याचे मान्य केले होते, मात्र सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवरील प्रतिक्रिया पाहता सध्या हा विवाह रद्द करण्यात आला. असं आमदारानं सांगितलं. (BJP leader daughter set to marry Muslim man netizens furious after wedding card goes viral )

उत्तराखंडचे भाजप नेता आणि पौरीचे नगरपालिका अध्यक्ष यशपाल बेनाम यांच्या मुलीचा मोनिकाचे लग्न अमेठीच्या पुरेबाज गावातील मोहम्मद मोनिस याच्याशी होणार होतं. 28 मे रोजी हा लग्न होणार होते. याच सोहळ्यासाठी बेनाम यांच्या पत्नी उषा रावत यांनी पाहुण्यांना आमंत्रण पाठवलं. दरम्यान, पक्षातील अनेक नेते प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला.

BJP
Disaster Management : नैसर्गिक आपत्तींमुळे २५ लाख लोक विस्थापित

तणावाचे वातावरण पाहता लोकप्रतिनिधी या नात्याने दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून लग्नासंदर्भात निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी 26, 27 आणि 28 तारखेला होणारे लग्नाचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

BJP
Medicines : निर्यातीआधी औषधांच्या होणार चाचण्या; औषधांच्या गुणवत्तेवर परदेशात प्रश्नचिन्ह

शुक्रवारी कोटद्वार, पौडी येथे विश्व हिंदू परिषद, भैरव सेना आणि बजरंग दल या हिंदू संघटनांनी लग्नाला विरोध केला. बेनाम यांच्या पुतळ्याचेही दहन केले. अशा विवाहांना चुकीचे ठरवून, विश्व हिंदू परिषदेचे पौडीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष दीपक गौर म्हणाले, "एकतर बेनमच्या मुलीने इस्लाम धर्म स्वीकारावा किंवा तिच्या भावी जावयाने हिंदू धर्म स्वीकारावा."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com