धर्माशिवाय राजकारणाला अर्थ नाही : जे. पी. नड्डा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

- वर्तन कसे करावे हे धर्म शिकवतो.

- काय करावे आणि काय करू नये हे धर्म शिकवतो.

वडोदरा : कसे वागावे आणि कसे वागू नये याचे मार्गदर्शन धर्म करतो, त्यामुळे धर्माशिवाय राजकारणाला अर्थ नाही, असे वक्तव्य भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वामिनारायण सांप्रयादायातर्फे आयोजित कार्यक्रमात नड्डा बोलत होते. राजकारणाचा धर्माशी नेमका काय संबंध आहे, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र मला वाटते की, धर्माशिवाय राजकारणाला काहीही अर्थ उरणार नाही. राजकारण हे नेहमीच धर्मासोबत चालत असते. तसेच धर्माचा अर्थ आचारसंहिता आहे. त्यामुळे धर्माशिवाय राजकारणाला कोणताही अर्थ नाही. जेव्हा विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नकारात्मकता पसरवून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा पंतप्रधान विकासात सर्वांना सोबत घेऊन अधिक उर्जेने पुढे गेले. 

वर्तन कसे करावे हे धर्म शिकवतो. काय करावे आणि काय करू नये हे धर्म शिकवतो. त्यामुळे धर्माची सर्वाधिक गरज ही राजकारणात आहे, असेही नड्डा यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader JP Nadda Commented on Politics and Religion