
भाजप नेत्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू; पंजाबमध्ये यावर्षीची पहिली घटना
चंदीगड : पंजाबमध्ये यावर्षी स्वाइन फ्लूमुळे (swine flu) मृत्यूची पहिली घटना समोर आली आहे. लुधियानामध्ये वकील आणि भाजप नेते संदीप कपूर (४६, रा. किचलूनगर) यांचा स्वाईन फ्लूने H१N१ मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते भाजपच्या विधी व विधिमंडळ सेलचे सहसंयोजक होते. १७ जून रोजी त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर दयानंद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. (BJP leader dies of swine flu in punjab)
पंजाबमध्ये स्वाइन फ्लूमुळे (swine flu) झालेला हा पहिला मृत्यू आहे. सध्या स्वाइन फ्लूचे आणखी दोन रुग्णही रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णांमध्ये एक व्यक्ती ५२ वर्षांची तर दुसरी ५७ वर्षांची आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे, असे राज्याचे महामारी तज्ज्ञ डॉ. गगनदीप सिंग ग्रोव्हर म्हणाले.
हेही वाचा: भातखळकर म्हणतात, अडीच वर्षांचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!
संदीप कपूर यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना रोगप्रतिबंधक उपचार देण्यात आले. त्यापैकी कोणालाही संसर्ग झाल्याचे आढळून आले नाही. यापैकी एकाही रुग्णाचा प्रवासाचा इतिहास नव्हता. कपूर हे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले असावेत, असा संशय आरोग्य विभागाला असल्याचे लुधियानाचे सिव्हिल सर्जन डॉ. एसपी सिंह म्हणाले.
कपूर यांच्यावर केव्हीएम शाळेजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. साधारणतः: मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात स्वाइन फ्लूचे (swine flu) प्रमाण जास्त असते.
Web Title: Bjp Leader Sandeep Kapoor Dies Of Swine Flu In Punjab
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..