Sonali Phogat Case : गरज पडल्यास हे प्रकरण सीबीआयकडं सोपवू; CM सावंतांची मोठी माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Pramod Sawant BJP leader Sonali Phogat

सोनाली फोगाट हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीय.

Sonali Phogat Case : गरज पडल्यास हे प्रकरण सीबीआयकडं सोपवू; CM सावंतांची मोठी माहिती

नवी दिल्ली : टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाटच्या (BJP leader Sonali Phogat) मृत्यूशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) आतापर्यंत पाच जणांना अटक केलीय. एवढंच नाही तर खुद्द गोवा पोलिसांनीही सोनाली फोगाटला मृत्यूपूर्वी ड्रग्ज दिल्याची पुष्टी केलीय. आता या प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांचं वक्तव्यही समोर आलंय. गरज पडल्यास आम्ही हे प्रकरण सीबीआयकडं देऊ, असं ते म्हणालेत.

हेही वाचा: शिवसेनेत मोठे फेरबदल; ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणाऱ्या सावंत, भास्कर जाधवांना मिळालं 'प्रमोशन'

सोनाली फोगाट प्रकरणी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Haryana CM Manohar Lal Khattar) यांनी शनिवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी तपास आणि सीबीआय तपासात सहकार्य करण्यासाठी हरियाणातून अधिका-यांची विशेष टीम पाठवण्याबाबतही त्यांनी बोललं होतं. तर, आता गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांचं वक्तव्यही समोर आलंय.

हेही वाचा: माझ्या आधी खैरेंचा कसा सत्कार करता? भरकार्यक्रमातून शिरसाट चिडून निघाले

सीएम प्रमोद सावंत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, 'हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत माझ्याशी बोलून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केलीय.' ते पुढं म्हणाले, 'या प्रकरणाच्या चौकशीनंतर गरज पडल्यास हे प्रकरण सीबीआयकडं देण्यात येईल. आम्ही सखोल तपास करत आहोत. यामध्ये जो कोणी सहभागी असल्याचं आढळून आल्यास, त्याला कठोर शिक्षा होईल. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दोषींवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार काम करत असून गोवा पोलीस पहिल्या दिवसापासूनच तपासाला पूर्ण सहकार्य करत आहे.'

हेही वाचा: गुलाम नबी आताच 'आझाद' झालेत, पण अमेठी..; इराणींनी काँग्रेससह राहुल गांधींची उडवली खिल्ली

सोनाली फोगाट हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक

सोनाली फोगाट हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीय. यात मुख्य आरोपी सुधीर सांगवान, सुखविंदर सिंह, गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटचे मालक एडविन न्युन्स, दत्त प्रसाद गांवकर आणि रामा मांडरेकर यांचा समावेश आहे. पोलिसांनी काल दोन मुख्य आरोपींसह चार आरोपींना गोव्याच्या म्हापसा कोर्टात हजर केलं होतं, तेथून त्यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.

Web Title: Bjp Leader Sonali Phogat Goa Cm Pramod Sawant Says If Required Will Give This Case To Cbi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..