esakal | रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये लीटर तर रावणाच्या लंकेत 51 रुपये, सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर
sakal

बोलून बातमी शोधा

subramaniyan swamy.png

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पात पेट्रोल प्रति लीटर 2.5 रुपये आणि डिझेलवर 4 रुपये प्रति लीटर सेस (उपकर) लावण्याची घोषणा केली होती. 

रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये लीटर तर रावणाच्या लंकेत 51 रुपये, सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवरुन आपल्याच सरकारला घेरले आहे. रामाच्या भारतात सीतेच्या नेपाळ आणि रावणाच्या लंकेच्या तुलनेत पेट्रोलचे दर जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पात पेट्रोल प्रति लीटर 2.5 रुपये आणि डिझेलवर 4 रुपये प्रति लीटर सेस (उपकर) लावण्याची घोषणा केली होती. 

सुब्रमण्यम स्वामींनी मंगळवारी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, रामाच्या भारतात पेट्रोलची किंमत 93 रुपये, सीतेच्या नेपाळमध्ये 53 रुपये आणि रावणाच्या लंकेत 51 रुपये प्रति लीटर पेट्रोल आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतेच बदल झालेले नाहीत. 

हेही वाचा- 7 प्रवाशांनी पोटात लपवलं होतं तब्बल 4 किलो सोनं, विमानतळावर उतरताच...

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल होतो. सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमिशन आणि इतर बाबी जोडल्यानंतर त्याचे दर दुप्पट होऊन जातात. विदेशी चलनांच्या दरांबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमती काय आहेत, यावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतात. 

असा जाणून घ्या आपल्या शहरातील दर
पेट्रोल-डिझेलच्या किंमती एसएमएसच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला आरएसपी आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. तो कोड आपल्याला आयओसीएलच्या वेबसाइटवर मिळेल. 

दरम्यान, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी टि्वटरवर सुब्रमण्यम स्वामी यांचे मोठे कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहेकी, मी नेहमीच डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांना आपला आदर्श मानले आहे. डॉ. स्वामी यांच्या जीवनाचे सहस्त्रचंद्र दर्शन (1000 पौर्णिमा) पूर्ण झाले आहेत. या आनंदानिमित्त मी माझ्या गुरुंचे दिल्लीतील निवासस्थान वसंत कुंज येथे उत्सव साजरा करण्यात आला. 

loading image