ठाकरेंनी महाआघाडी तोडावी अन्यथा...; भाजप नेत्याने दिला इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 20 मे 2020

उद्धव ठाकरे यांनी महाविाकास आघाडी तोडावी आणि राज्य सरकार बरखास्त करावे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवून टाकतील असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविाकास आघाडी तोडावी आणि राज्य सरकार बरखास्त करावे. अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवून टाकतील असा इशारा भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. त्यांनी ट्विट करत हा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे सरकार असमर्थ ठरत असून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो. उद्धव यांनी आत्ताच महाविकासआघाडी तोडावी. आर्टिकर ३५६ नुसार यावर राष्ट्रपती निर्णय घेऊ शकतात असेही त्यांनी सुचविले आहे. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे ते म्हणाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होत आहे. राज्य सरकार करत असलेल्या कामाचीही सर्व स्तरावर स्तुती होत असली तरी आता महाविकासआघाडीचे नेते स्वामी यांच्या या इशाऱ्याला कशाप्रकारे उत्तरे देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Subramanian Swamy tweet Uddhav Break alliance with NCP and Congress