esakal | भाजप युवा मोर्चाच्या नेत्याचं बेंगळुरूविषयी धक्कादायक वक्तव्य; सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

tejaswi surya

भाजप खासदार तेजस्वी सुर्या (Tejasvi Surya) यांनी बेंगळुरुविषयी मोठं वक्तव्य केलंय.

भाजप युवा मोर्चाच्या नेत्याचं बेंगळुरूविषयी धक्कादायक वक्तव्य; सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

बेंगळुरु- भाजप युवा मोर्चाचे नवनियुक्त प्रमुख आणि खासदार तेजस्वी सुर्या (Tejasvi Surya) यांनी बेंगळुरुसंबंधी मोठं वक्तव्य केलंय. बेंगळुरु दहशतवादी उपक्रमांचे (Terror Activites) केंद्र बनले आहे, असा दावा सुर्या यांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. राष्ट्रीय चौकशी विभागाचे एक कायमस्वरुपी कार्यालय कर्नाटकच्या राजधानीमध्ये असावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

तेजस्वी सुर्या बेंगळुरु दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी रविवारी काही गंभीर वक्तव्ये केली आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारताची सिलिकॉन व्हॅली दहशतवादी कृत्यांची केंद्र बनली आहे. चौकशी विभागाकडून करण्यात आलेली अनेकांनी अटक आणि इतर खुलाशांमधून हे स्पष्टही होत आहे. त्यामुळे बेंगळुरुमध्ये राष्ट्रीय चौकशी विभागाचे एक कायमस्वरुपी कार्यालय असावे, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये भाजपचेच सरकार आहे. 

भाजपने केले काँग्रेसला 'फॉलो'; 'लूझर्स लक', अपयशी नेत्यांना...

बेंगळुरुमध्ये राष्ट्रीय चौकशी विभागाचे कार्यालय असावे. कार्यालय आधुनिक असावे आणि कर्मचाऱ्यांची संख्याही मुबलक असावी. गृहमंत्री अमित शहा यांनी मला विश्वास दिला आहे की, लवकरच पोलिस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक कायमस्वरुपी कार्यालय सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील, असं सुर्या म्हणालेत. दरम्यान, भाजपने तेजस्वी सुर्या यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तेजस्वी सुर्या यांना युवा मोर्चाचे प्रमुख बनवले आहे. 

काँग्रेसने केली टीका

तेजस्वी सुर्या यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेता डी.के. शिवकुमार यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाजप नेत्याचे वक्तव्य बेंगळुरुसाठी शरमेची गोष्ट आहे. भाजपने आपल्या नेत्यावर कारवाई करायली हवी, असं काँग्रेसने म्हटलं आहे.