6 कोटींनी वाढली भाजपची सदस्यसंख्या; महाराष्ट्रातही 50 लाखांची वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 29 August 2019

केंद्रातील सत्तारूढ भाजपच्या नुकत्याच झालेल्या नोंदणी मोहीमे अखेर पक्षाच्या ऑनलाईन सदस्य संख्येत सुमारे 6 कोटींची वाढ झाली आहे. हा आकडा जमेला धरल्यास जगातील आठ देश वगळता जगातील उर्वरीत देशांच्या प्रत्येकी लोकसंख्येपेक्षा एकट्या भाजपचे सदस्य जास्त आहेत, असा दावा कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केला.​

नवी दिल्ली ः केंद्रातील सत्तारूढ भाजपच्या नुकत्याच झालेल्या नोंदणी मोहीमे अखेर पक्षाच्या ऑनलाईन सदस्य संख्येत सुमारे 6 कोटींची वाढ झाली आहे. हा आकडा जमेला धरल्यास जगातील आठ देश वगळता जगातील उर्वरीत देशांच्या प्रत्येकी लोकसंख्येपेक्षा एकट्या भाजपचे सदस्य जास्त आहेत, असा दावा कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केला.

निवडणुकीच्या तोंडावर उभ्या असेलल्या महाराष्ट्रातील भाजप सदस्यांमध्ये किमान 50 लाखांची वाढ झाल्याचे केंद्रीय सदस्य नोंदणी समितीचे सदस्य अरूणकुमार यांनी "सकाळ' ला सांगितले. यंदाच्या प्रक्रियेत राज्यावरील महापुराच्या आपत्तीमुळे खंड पडला असेही ते म्हणाले.

नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य नोंदणी समितीची बैठक झाली. शिवराजसिंह चौहान, अरूणुमार, दुष्यंत गौतम, अनिल बलुनी आदी उपस्थित होते. यानंतर तालुका,जिल्हा व राज्य पातळीच्या संघटनात्मक निवडणुका डिसेंबरअखेर पूर्ण होतील. डिसेंबरमध्येच नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार असून नड्डा यांचे नाव त्यासाठी आघाडीवर आहे. महाराष्ट्रासह चार राज्यांच्या निवडणुका अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली व नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भाजप लढविणार आहे. कलम 370 हटविण्याचा कायदा संसदेत मंजूर झाल्यानंतर भाजप सदस्य नोंदणीत "चमत्कार'' झाला असेही नड्डा म्हणाले.

वाराणसी व तेलंगणातून (ता. 6 जुलै) सुरू झालेली भाजप सदस्य नोंदणी मोहीम 20 ऑगस्टला संपली. महाराष्ट्रात 50 लाख व हरियाणात 25 लाख नवे सदस्य भाजपमध्ये आले आहेत. नड्डा म्हणाले की, केवळ ऑनलाईन नव्या सदस्यांची संख्या 5 कोटी 81 लाख 34 हजार 242 झाली असून अर्जांद्वारे व मिस्ड कॉल देऊन सदस्य बनलेल्यांची गणती अजून व्हायची आहे. ती झाल्यावर भाजपच्या परिवारातील सध्याच्या 11 कोटी सदस्यांमध्ये आणखी किमान 7 ते 8 कोटी नवे सदस्य सामील होतील.

भाजपच्या घटनेप्रमाणे दरवर्षी 20 टक्के सदस्य वाढविणे अपेक्षित असते. मात्र, यंदा हे प्रमाण 50 टक्‍क्‍यांवर गेले आहे. या मोहिमेसाठी सत्तारूढ भाजपने पावणेदोन लाख विस्तारक नेमले होते. त्यांनी नवे सदस्य करण्याबरोबरच पावणेदोन लाख वृक्षारोपणही केले. पश्‍चिम बंगाल, ईशान्य भारत व जम्मू काश्‍मीर येथून भाजपचे सदस्य होण्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील चलास्मा भागातील बूथ क्र.14 मधील सर्व म्हणजे एकुण 17 गजार मतदार भाजप सदस्य बनले आहेत. 

मोदींच्या वाढदिनी सेवा सप्ताह 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबरला येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भाजप देशभरात "सेवा सप्ताह' साजरा करणार आहे. 14 ते 20 सप्टेंबर या आठवड्यात भाजप हा सेवा सप्ताह साजरा करेल असे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp members has increased by six crore