
भोपाळ : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या पत्रकार परिषदांमुळे चर्चेत आलेल्या लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह, जातीवादी आणि लिंगवादी वक्तव्य केल्याप्रकरणी मध्य प्रदेशमधील मंत्री विजय शहा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश येथील उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. विजय शहा यांची भाषा ‘गटार’ असल्याचे म्हणत न्या. अतुल श्रीधरन आणि न्या. अनुराधा शुक्ला यांनी त्यांची जोरदार खरडपट्टी काढली.