
जयपूरमधील हरदेव जोशी पत्रकारिता आणि जनसंपर्क विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील सुविधांच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान भाजपचे बांदिकुईचे आमदार भागचंद टांकडा यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप झाला आहे. “जास्त बोलाल तर अंगावर गाडी घालेन” असे वक्तव्य त्यांनी केले असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.