राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण यांचा विरोध कायम

brij bhushan sharan singh and raj thackeray ayodhya
brij bhushan sharan singh and raj thackeray ayodhya

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे, त्यांच्या या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण यांनी विरोध करत जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही असा इशारा दिला आहे. दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

भाजप नेते बृजभूषण म्हणाले की, पाप करणारा पापात भागीदार नसतो, जो सक्षम असताना देखील पाप रोखण्याचा प्रयत्न करत नाही तो देखील त्यात भागीदार असतात, भाजपची राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत भूमिका काय आहे, ते मला माहीत नाही, हा माझा व्ययक्तिक मुद्दा आहे. अयोध्या सगळ्यांची आहे, सगळ्याना येथे येण्याचा अधिकार आहे, पण राज ठाकरे माफी न मागता अयोध्यात आले तर त्यांच्या विरोध करणार असे त्यांनी याआधीच जाहीर केलं होतं.

brij bhushan sharan singh and raj thackeray ayodhya
आता महाराष्ट्रातून भाजपचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध

दरम्यान आज बृजभूषण यांनी आज, राज ठाकरेंना ही तुमची राजकीय भेट आहे, धार्मिक भेट नाही,असे सुनावले. हे सहा महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी यांच्यावर टीका करत होते. देशाचा नेता बनायचे असेल तर बना, पण ज्यांना त्रास दिला आहे, त्यांची माफी मागा, असे ते म्हणाले. बृजभूषण यांनी यावेळी सांगितले की, त्यांनी अयोध्या येथे साधुसंताची बैठक बोलवली त्यामध्ये सर्व संताची जवळपास एक लाखांची गर्दी जमली, त्या बैठकीत जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तो पर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

brij bhushan sharan singh and raj thackeray ayodhya
मुख्यमंत्र्यांची RSS वर टीका; पुण्यातील नाराज शिवसेना नेत्याचा पक्षाला रामराम

देशाचे नेते व्हायचं असेल तर व्हा, पण आधी माफी मागा, संताची नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागा, तेही नाही तर, योगींची माफी मागा, तेही करणार नसेल तर मग आमच्या जखमांवर मीठ चोळायला अयोध्येत येत आहात का? असा सवाल त्यांनी या वेळी केला.पुढे बोलताना बृजभूषण यांनी राज ठाकरे यांना पत्रकार परिषद घेऊन माफी मागा आणि 5 जूननंतर तुमचा दौरा ठरवा, तुम्हाला कोणताही विरोध होणार नाही असे स्पष्ट केले.

brij bhushan sharan singh and raj thackeray ayodhya
जर मोदी तुरुंगात जाऊ शकतात तर फडणवीसही....; सचिन सावंतांची टीका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com