esakal | भाजपा खासदाराने स्वत: साफ केलं कोविड सेंटरमधील शौचालय
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपा खासदाराने स्वत: साफ केलं कोविड सेंटरमधील शौचालय

भाजपा खासदाराने स्वत: साफ केलं कोविड सेंटरमधील शौचालय

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोविड वॉर्डमधील फरशी साफ केल्यामुळे अलिकडेच मिझोरमचे ऊर्जामंत्री (power minister) आर. लालजिर्लियाना चर्चेत आले होते. त्यांच्यानंतर आता मध्य प्रदेशमधील भाजपा खासदार जनार्दन मिश्रा (janardan mishra) चर्चेत आले आहेत. मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यातील कोविड सेंटरची पाहणी करण्यास गेलेल्या मिश्रा यांनी चक्क तेथील तुंबलेलं शौचालय साफ केलं आहे. याविषयी free press journal च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. (bjp mp janardan mishra cleans dirty toilet at covid centre)

हेही वाचा: कौतुकास्पद! चक्क कोविडग्रस्त मंत्र्यांनी स्वच्छ केली वार्डमधील फरशी

जनार्दन मिश्रा सध्या कुचबिहारमधील कोरोना केंद्रांचा पाहाणी दौरा करत असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी मौगंज येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी या सेंटरमधील शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं निदर्शनास आलं. इतकंच नाही तर हे शौचालये अतिशय अस्वच्छ असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मिश्रा यांनी थेट हातात ब्रश घेत हे शौचालय साफ करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे जर वेळोवेळी शौचालयाची स्वच्छता न केल्यास संबंधित अधिकाऱ्याविरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, मिश्रा यांची शौचालय साफ करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील त्यांनी २०१८ मध्ये स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी खाजुआ गावातील शाळेमधील शौचालय साफ केले होते. विशेष म्हणजे यावेळी मिश्रा यांनी कोविड सेंटरमधील शौचालय साफ केल्यानंतर त्यांचा शाळेतील जुना व्हिडीओदेखील पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते स्वत: शौचालय स्वच्छ करतांना दिसत आहेत.

loading image
go to top