Lok Sabha Election 2024 : हवामान बदल? गंभीर पाठोपाठ आणखी एका दिल्लीच्या खासदाराने ठोकला राजकारणास रामराम, सांगितलं कारण

Lok Sabha Election 2024 Latest News : सध्या देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत.
BJP MP Jayant Sinha asks to be relieved of electoral duties after Gautam Gambhir lok sabha election 2024
BJP MP Jayant Sinha asks to be relieved of electoral duties after Gautam Gambhir lok sabha election 2024

BJP Jayant Sinha Latest News : सध्या देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान भाजपचे खासदार जयंत सिन्हा यांनी निवडणूक जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. शनिवारी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे त्यांना प्रत्यक्ष निवणडूक जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे अशा विनंती केल्याचे सांगितले आहे. भारत आणि जगाभरातील जागतिक हवामान बदलाचा सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही मागणी केल्याचेही जयंत सिन्हा म्हणालेत.

महत्वाची बाब म्हणजे याआधी खासदार गौतम गंभीर यांने देखील याच प्रकारची पोस्ट करत जेपी नड्डा यांच्याकडे निवडणूक जबाबदारीपासून मुक्त करण्याची मागणी केली होती. गंभीरने मागणी केल्यानंतर लगेच काही तासात जयंत सिन्हा यांनी देखील तशीच मागणी केली आहे.

BJP MP Jayant Sinha asks to be relieved of electoral duties after Gautam Gambhir lok sabha election 2024
Who is Harsha Sai : गरिबांना पैसे वाटणाऱ्याचा व्हिडिओ 12 कोटी जणांनी पाहिला, कोण आहे हर्षा साई? कुठून करतो कमाई

जयंत सिन्हा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना मला माझ्या प्रत्युक्ष निवडणूक जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून मी भारत आणि जगभारातील जागतिक हवामान बदलांचा सामना करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रीत करू शकेल. मी आर्थिक आणि शासन संबंधी मुद्द्यांवर पक्षासोबत काम करणे सुरूच ठेवेल. मला मागील दहा वर्षात भारत आणि हजारीबाग येथील लोकांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले आङे. याव्यतिरीक्त मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेतृत्वाने दिलल्या अनेक संधी मिळाल्या आहेत, त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो, जय हिंद.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजप आगामी लोकसभा निवडणूकीत अनेक नवीन नेत्यांना संधी देण्याचा विचार करतच आहे. सध्या असलेल्या काही खासदारांना पक्षाने संघटनात्मक कामांवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भाजपचे आणखी काही खासदार लोकसभा निवडणूक 2024 न लढण्याची घोषणा करू शकतात.

BJP MP Jayant Sinha asks to be relieved of electoral duties after Gautam Gambhir lok sabha election 2024
Gautam Gambhir Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीपूर्वी गौतम गंभीरने राजकारणाला ठोकला राम राम; 'या' पोस्टने उडाली खळबळ

माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर याने देखील एक्सवर पोस्ट करत आपल्याला निवडणूक जबाबदाऱ्यांमधून मुक्त केलं जावं अशी मागणी पक्षाच्या अध्यक्षांकडे केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com