हिंडेनबर्ग प्रकरणी मोदींवर केलेले आरोप राहुल गांधींना भोवणार? लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता - BJP MP Nishikant Dubey seeks Rahul Gandhi Lok Sabha membership termination | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Rahul Gandhi : हिंडेनबर्ग प्रकरणी मोदींवर केलेले आरोप राहुल गांधींना भोवणार? लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता

Rahul Gandhi : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आज (शुक्रवार) संसदीय समितीसमोर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकार सूचनेचा भंग केल्याप्रकरणी समितीसमोर आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. भाजप खासदार सुनील सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या भागात राहुल गांधींच्या भाषणानंतर दुबे यांनी ७ फेब्रुवारीला गांधींविरोधात विशेषाधिकाराचा भंग केल्याप्रकरणी नोटीस दिली होती. राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान हिंडेनबर्ग-अदानी प्रकरणावर भाष्य केले होते.

हिंडेनबर्ग अहवालाद्वारे कोणत्याही पुराव्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची बदनामी करणे म्हणजे देशाच्या प्रतिमेला धक्का असल्याचे दुबे यांनी समितीसमोर सांगितले. आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात राहुल गांधींनी ७५ वेळा अदानी यांचे नाव घेतल्याचे देखील दुबे म्हणाले.

दरम्यान हिंडेनबर्ग अदानी प्रकरणात विशेषाधिकार समिती पुढील आठवड्यात राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. 

लोकसभेच्या विशेषाधिकार समितीसमोर आपली भूमिका मांडताना दुबे म्हणाले, लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींचे विधान सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकल्यानंतरही ते त्यांच्या आणि काँग्रेसच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. 

गांधींनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हणत दुबे यांनी समितिसमोर काही पुरावे देखील सादर केले. उद्योगपती गौतम अदानी यांचे विविध व्यवहार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात झाले होते, असे दुबे यांचे म्हणणे आहे. 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले आहेत. ते केवळ लोकसभेचे सदस्य नाहीत तर सभागृहाचे नेते आहेत. राहुल गांधी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता लोकसभेच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या भाषणात अनेक राष्ट्रांच्या सरकारांच्या प्रमुखांचे नाव घेतले जे नियमांचे उल्लंघन आहे, असे दुबे यांनी म्हटले. इंडीयन एक्सप्रेसने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

टॅग्स :Narendra ModiRahul Gandhi