esakal | नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ प्रज्ञा ठाकूर पुन्हा मैदानात; म्हणाल्या, काँग्रेसने नेहमीच...
sakal

बोलून बातमी शोधा

pradnya thakur nathuram godse

याआधी 2019 च्या निवडणुकीमध्ये जेंव्हा त्यांनी गोडसेला देशभक्त म्हटलं होतं तेंव्हा राजकारण चांगलंच तापून उलटसुलट चर्चा झाली होती.

नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ प्रज्ञा ठाकूर पुन्हा मैदानात; म्हणाल्या, काँग्रेसने नेहमीच...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भोपाळ : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आता पुन्हा एकदा चर्चेच आल्या आहेत. प्रज्ञा ठाकून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी तशाही सातत्याने चर्चेत असतातच. प्रज्ञा ठाकूर यांचं नथुरामप्रेम काही लपून राहिलेले नाहीये. खासदार असूनही नथुरामचं इतकं उघड उघड समर्थन करणाऱ्या त्या भाजपच्या खासदार आहेत. याआधी 2019 च्या निवडणुकीमध्ये जेंव्हा त्यांनी गोडसेला देशभक्त म्हटलं होतं तेंव्हा राजकारण चांगलंच तापून उलटसुलट चर्चा झाली होती. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी प्रज्ञा ठाकून यांना कधीच माफ करणार नाही, असं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा प्रज्ञा ठाकून याचप्रकारच्या वक्तव्यासाठी चर्चेत आल्या आहेत.

दिग्विजय सिंहांवर भडकल्या ठाकूर
दिग्विजय सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता. भाजपच्या लोकांना तर असले लोक देशभक्त वाटतात. जेंव्हा याच बाबत प्रज्ञा सिंह ठाकूर यांना विचारण्यात आलं तेंव्हा त्या म्हणाल्या की, काँग्रेसच्या लोकांचा आजवरच्या इतिहासच असा राहिलाय की,  ते देशभक्त लोकांच्या बाबतीत काहीही वाईटसाईट बोलत राहतात आणि त्यांचा छळ करतात. यामध्ये काही नवी गोष्ट नाहीये. प्रज्ञा ठाकूर  यांनी पुढे म्हटलंय की काँग्रेसच्या लोकांनी तर भगव्याला देखील दहशतवादाशी जोडलं आहे. आता याहून अधिक निकृष्ट दर्जाचं काम काय असू शकतं?

हेही वाचा - कृषी कायद्यांना स्थगिती, समितीची स्थापना; शरद पवार म्हणतात, हा निर्णय म्हणजे...​
भगव्याच्या बदनामीचा प्रयत्न असहनीय
प्रज्ञा ठाकूर यांना नथुराम गोडसेबद्दल इतकं प्रेम का याबाबत त्या म्हणाल्या की, नथुराम गोडसे यांना समग्र पातळीवर समजून घेतलं गेलं नाहीये. काँग्रेसच्या लोकांनी अनेक दशकांपर्यंत प्रोपगंडा केला आहे. त्या म्हणाल्या की मी हिंसक गोष्टींचं समर्थन करत नाही मात्र जेंव्हा एका विशिष्ट हेतूने भगव्याला बदनाम करण्याचा कट रचला जातो तेंव्हा गप्प बसणे देखील अयोग्य असते. 

loading image
go to top