Operation Lotus: भाजप खासदारांनी पत्र लिहून केजरीवालांच्या आरोपाच्या चौकशीची केली मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Operation Lotus: भाजप खासदारांनी पत्र लिहून केजरीवालांच्या आरोपाच्या चौकशीची केली मागणी

Operation Lotus: भाजप खासदारांनी पत्र लिहून केजरीवालांच्या आरोपाच्या चौकशीची केली मागणी

भाजप खासदारांनी उप-राज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी आप आमदारांना 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी दारू आणि शिक्षणातील यावरून लोकांचे लक्ष वळावे म्हणून केजरीवाल यांनी हे आरोप केले, असा दावा भाजप खासदारांनी केला आहे.

भाजप खासदारांनी त्यांच्या पत्रात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया तसेच इतर नेत्यांचे आरोप दुर्भावनापूर्ण, खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, या बदनामीकारक आणि बिनबुडाच्या आरोपांमुळे भाजप खासदारांना खूप वेदना होत आहेत. आमची विनंती आहे की, याची चौकशी झाली पाहिजे जेणेकरून सत्य दिल्लीतील तसेच देशातील जनतेसमोर येईल.

हेही वाचा: झारखंड आमदारांच्या खरेदीसाठी केंद्राने वाढवल्या तेलाच्या किमती; CM अरविंद केजरीवाल

भाजप आपल्या आमदारांना 800 कोटींमध्ये विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. 20 कोटी रुपये देऊन 'आप'चे 40 आमदार फोडण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यांनी विचारले, एवढी मोठी रक्कम कुठून आणली आणि ठेवली कुठे? त्याचवेळी भाजपने केजरींच्या या दाव्याला फिल्मी स्क्रिप्ट असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: राजधानीत राजकारणाचे रणांगण

दिल्लीतील आरोग्य आणि अबकारी धोरणातील घोटाळ्यांनंतर सरकारने शिक्षणातही मोठा घोटाळा केला असल्याचा दावा भाजपने केला आहे. दिल्लीतील शाळांमध्ये 2400 खोल्यांची गरज होती, मात्र ती वाढवून 7180 खोल्या करण्यात आल्या. बांधकामाची रक्कम 50 वरून 90 टक्के करण्यात आली. यानंतर, CVC ने 17 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्ली सरकारच्या सचिवांना एक अहवाल पाठवला. पण केजरीवाल यांनी 30 महिने त्यांच्यावर कारवाई केली नाही.केजरीवाल यांच्याकडे निविदेतील 326 कोटींचा हिशेब नाही. कोणत्याही निविदेत बदल झाला तर तो सार्वजनिक क्षेत्रात येतो पण केजरीवाल सरकारने तसे केले नाही, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

Web Title: Bjp Mps Wrote A Letter To Lieutenant Governor Demanding A Probe Into Allegations Of Cm Arvind Kejriwal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpArvind Kejriwaldelhi