esakal | भाजपची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; वरुण आणि मनेका गांधी यांची गच्छंती
sakal

बोलून बातमी शोधा

Varun Gandhi and Maneka Gandhi

दीड वर्षापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे आणि बंगाल निवडणुकी आधी भाजप प्रवेश केलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वरुण आणि मनेका गांधी यांची गच्छंती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भाजपने नव्या कार्यकारिणीची घोषणा केली असून यामधून मनेका गांधी आणि वरुण गांधी यांची नावे वगळण्यात आली आहेत. याशिवाय विनय कटियार यांचाही पत्ता कट झाला आहे. दीड वर्षापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे आणि बंगाल निवडणुकी आधी भाजप प्रवेश केलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाही. तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि वरुण गांधींच्या आई मनेका गांधी देखील राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर आहेत. गेल्या काही दिवसांपासून वरुण गांधी हे सरकारच्या धोरणांच्या विरोधात बोलत आहेत. सध्याच्या लखीमपूर मुद्द्यावरूनसुद्धा त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळेच त्यांचा पत्ता कट केला असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा: हत्येनं आंदोलकांना गप्प करू शकत नाही - भाजप खासदार वरुण गांधी

वरुण गांधी, मेनका गांधी, विनय कटियार यांच्याशिवाय विजया रहाटकर यांचीही ऱाष्ट्रीय कार्यकारिणीतून भाजपने गच्छंती केली आहे. एकूण ३०९ सदस्यांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, राज्यसभा, लोकसभा, संसदीय कार्यालय सचिव इत्यादींचा समावेश आहे.

loading image
go to top