भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी चुकवलं सावरकरांचे नाव

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी चुकवलं सावरकरांचे नाव

नवी दिल्ली: आज स्वातंत्र्यवीर विनायक दामदोर सावरकर यांची आज जंयती पार पडली. सावरकरांच्या १८८ व्या जयंतीनिमित्त राजकीय नेत्यांनी ट्विट करुन त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे. सावरकर हे भारतीय जनता पार्टीसाठी नेहमीच वंदनीय राहिले आहेत. आपले वैचारिक अधिष्ठान म्हणून सावरकरांना हिंदुत्ववाद्यांकडून पाहिलं जातं. काँग्रेसकडून यासंदर्भात टीका झाल्यावर भाजप नेहमीच सावरकरांची बाजू हिरीरिने लढवतो. ''स्वांतत्र्याच्या लढ्याचे महान सैनिक आणि प्रखर राष्ट्रभक्त वीर सावरकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी नमन!'' अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले आहे. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यासंदर्भात केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. जेपी नड्डा यांनी सावरकरांना अभिवादन करताना चक्क त्यांचे नावच चुकवले आहे. सावरकरांना अभिवादन करण्याऐवजी नड्डा यांनी दामोदर सावरकर म्हणजेच सावरकरांच्या वडीलांना अभिवादन केलं आहे. त्यांच्या या चुकीवरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. (BJP national president misses Savarkar's name written in wrong way)

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी चुकवलं सावरकरांचे नाव
पुण्यात वीकेंड लॉकडाउन रद्द; आयुक्तांनी काढले नवे आदेश
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी चुकवलं सावरकरांचे नाव
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती; कोणत्या राजकीय नेत्यांनी केले ट्विट

जेपी नड्डा यांनी ट्विटरवर म्हटलंय की, महान क्रांतीकारी तसेच प्रखर देशभक्त, चिंतक, विचारवंत, लेखक, द्रष्टा तसेच साहित्यिक स्वातंत्र्यवीर वीर दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन! राष्ट्राप्रती आपलं सर्वस्व अर्पण करणारे सावरकर युगानुयुगे प्रेरणादायी राहतील, असं त्यांनी म्हटलंय. मात्र, त्यांनी नेमके सावरकरांचे नावच चुकवलं आहे. 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' असं म्हणण्याऐवजी दामोदर सावरकर म्हटल्याने त्यांच्यावर ही टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com