बंगळूर : कोडगू येथील भाजप (BJP) पदाधिकाऱ्याने शुक्रवारी बंगळूरमध्ये आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. विनय सोमय्या (वय ३५) असे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. हेन्नूर पोलिस ठाण्याच्या (Hennur Police Station) हद्दीत त्याच्या कार्यालयात ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.