भाजपला इलेक्टोरल बॉन्ड्समधून मिळाले काँग्रेसहून सातपट जास्त पैसे; तिजोरीत पडली 'इतक्या' कोटींची भर

निवडणूक आयोगाला सोपवण्यात आलेल्या वार्षिक ऑडिट रिपोर्टनुसार, 2022-23 मध्ये भाजपला एकूण 2,120 कोटी रुपये मिळाले ज्यामध्ये एकूण 61 टक्के हे इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाले आहेत.
BJP received rs 1300 crore funding from electoral bonds seven times more than congress marathi News
BJP received rs 1300 crore funding from electoral bonds seven times more than congress marathi News

केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून तब्बल 1,300 कोटी रूपयांच्या देणग्या मिळवल्या आहेत. ही रक्कम याच काळात काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांपेक्षा तब्बल सातपट अधिक आहे. (BJP received rs 1300 crore funding from electoral bonds seven times more than congress marathi News)

निवडणूक आयोगाला सोपवण्यात आलेल्या वार्षिक ऑडिट रिपोर्टनुसार, 2022-23 मध्ये भाजपला एकूण 2,120 कोटी रुपये मिळाले ज्यामध्ये एकूण 61 टक्के हे इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाले आहेत. यापूर्वी 2121-22 मध्ये पक्षाला एकूण 1,775 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. पक्षाच्या एकूण उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर 2022-23 मध्ये ते 2,360.8 कोटी रुपये होते, जे 2021-22 मध्ये 1,917 कोटी रुपये होते.

दुसरीकडे, काँग्रेसने इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 171 कोटी रुपये कमावले आहेत, जे 2021-22 या आर्थिक वर्षातील 236 कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत.

राज्य पातळीवर, समाजवादी पक्षाने 2021-22 मध्ये इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 3.2 कोटी रुपये कमावले होते, पण 2022-23 मध्ये या बाँडद्वारे त्यांना एकही रुपया मिळाला नाही. त्याच वेळी, तेलगू देसम पार्टी (टीडीपी)ला 2022-23 मध्ये इलेक्टोरल बॉन्डद्वारे 34 कोटी रुपये मिळाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10 पट जास्त आहेत.

व्याजातूनही भाजपची कमाई वाढली

भाजपला गेल्या आर्थिक वर्षात 237 कोटी रुपये व्याज म्हणून मिळाले आहेत, जे 2021-22 या वर्षाच्या तुलनेत 135 कोटी रुपये अधिक आहे. निवडणूक आणि सर्वसाधारण प्रचारावरील एकूण खर्चापैकी, भाजपने विमान आणि हेलिकॉप्टरच्या वापरासाठी 78.2 कोटी रुपये खर्च केलेय जे 2021-22 मध्ये खर्च केलेल्या 117.4 कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत. पक्षाने उमेदवारांना आर्थिक सहाय्य म्हणून 76.5 कोटी रुपये दिले, जे 2021-22 साठी देण्यात आलेल्या 146.4 कोटी रुपयांच्या तुलनेत कमी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com