Punjab: भाजपची 27 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

यापूर्वी भाजपने 34 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.
BJP
BJPesakal

पंजाब : भाजपने पंजाब विधानसभेसाठी (BJP Candidate List For Punjab Assembly Election 2022) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 27 उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. यापूर्वी भाजपने 34 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. एकूण 117 जागांपैकी भाजप 65 जागा, कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh)पंजाब लोक काँग्रेस 37 आणि शिरोमणी अकाली दल (युनायटेड) 15 जागा लढवणार आहेत.

उमेदवारांची नावे अशी

भोहा सीमा कुमारी, गुरदासपुर- परमिंदर सिंह गिल,बटाला- फतेह जंग बाजवा,डेरा बाबा नानक- कुलदीप सिंह,मजीठा- प्रदीप सिंह भुल्लर,अमृतसर- पश्चिम कुमार अमित वाल्मीकि-अटारी बलविंदर कौर,फगवाड़ा- विजय सांपला,शाहकोट- नरिंदर पाल सिंह चंडी,करतारपुर- सुरिंदर महे,जालंधर कैंट- सरबजीत सिंह मक्कड़,आनंदपुर साहिब- परमिंदर शर्मा,रूपनगर- इकबाल सिंह लालपुरा,चमकौर साहिब- दर्शन सिंह शिवजोत,एसएएस नगर (मोहाली)- संजीव वशिष्ठ,समराला- रंजीत सिंह गहलेवाल,लुधियाना- उत्तर प्रवीण बंसल,मोगा डा. -हरजोत कमल,गुरहरसहाय गुरपरवेज- सिंह संधू,बलुआना- वंदना सागवान,लंबी- राकेश ढींगरा,मौड़ दयाल-सिंह सोढ़ी,बरनाला- धीरज कुमार,धूरी- रनदीप सिंह देओल,नाभा- गुरप्रीत सिंह शाहपुर,राजपुरा- जगदीश कुमार जग्गा, घनौर- विकास शर्मा अशी उमेदवारांची नावे आहेत.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी (Captain Amarinder Singh) पंजाब विधानसभा निवडणुक लढण्याबाबत याआधी मोठी घोषणा केली होती. 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते पटियाला मतदारसंघातून लढणार असल्याचे त्यांनी घोषित केले. पटियाला मतदारसंघ हा त्यांचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com