Ravi Shankar Prasad : ‘काँग्रेसला सरकारी संपत्तीच्या दुरुपयोगाचा अधिकार नाही’; नॅशनल हेराल्डप्रकरणी भाजपचे मत
Indian Politics : नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसला सरकारी संपत्तीचा दुरुपयोग करण्याचा अधिकार नाही, असे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : राजकीय सूडभावनेपोटी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजपने फेटाळून लावला आहे.