नुपूर शर्मा प्रकरणी भाजपने झटकले हात; निवेदनाद्वारे दिलं स्पष्टीकरण

नुपूर शर्मा यांनी महमंद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.
BJP shakes hands in Nupur Sharma case Explanation by Statement
BJP shakes hands in Nupur Sharma case Explanation by Statement

नवी दिल्ली : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल काढलेल्या अनुद्गार प्रकरणी भाजपने हात झटकले आहेत. कोणत्याही धर्माचा कंवा धार्मिक व्यक्तीचा अपमान भाजप निंदनीय मानतो, अशा शब्दांत भाजपने शर्मा यांची पाठराखण करण्याचे साफ टाळले आहे व इतर प्रवत्यांनाही सक्त ‘मेसेज' दिला आहे.

भाजप राष्ट्रीय मुख्यालयाच्या प्रमुख अरुण सिंह यांनी आज याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करणारे निवेदन दिले. त्यात शर्मा यांच्याबाबतच्या वादापासून पक्षाने हात झटकल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप धार्मिक एकतेवर विश्वास ठेवतो. कोणत्याही धर्मातील पूजनीय व्यक्तींचा अपमान भाजपला मान्य नाही. कोणत्याही धर्म किंवा संप्रदायाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये-विचार भाजपला मान्य नाहीत. असे विचार निंदनीय आहेत. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म या मातीत रूजला व वाढला आहे. भाजप प्रत्येक ध४माचा सन्मान करतो. कोणत्याही धर्मातील व्यक्तींबाबत अनुद्गार काढणे हे पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात आहे व अशा द्वेषपूर्ण विचारांचा भाजप कधीही प्रसार करत नाही. भारताची राज्यघटना प्रत्येक नागरिकाला आपल्या पसंतीच्या दर्माचे आचरण, अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य देते. राज्यघटनेच्या पलीकडे व त्यापुढे भारतात काहीही नाही. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना भारताला एक महान देश बनविण्याच्या संकल्पाबरोबर भाजप कटिबध्द आहे. असा देश घडवायचा आहे जेथे सारे समान आहेत, सर्वांच्या श्रध्दांचा जेथए सन्मान केला जातो. भारताची एकता, अखंडता व विविधता यांच्या रक्षणासाठी व विकासाची फळे प्रत्येकालाच मिळावीत यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्यास भाजप वचनबध्द आहे.

भारतात अल्पसंख्यांकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत अमेरिकी कॉंग्रेसमध्ये सादर झालेल्या अहवालाचे जागतिक पडसाद उमटल्यावर सावध झालेल्या भाजप नेतृत्वाने आपत्ती व्यवस्थापनाला गती दिली आहे. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी भारतातील विविध देशांच्या राजदूतांबरोबर खास बैठका घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ‘भाजपा को जानो' असे या उपक्रमाचे नाव आहे. पक्षाच्या सागरपार शाखेचे प्रमुख विजय चौथाईवाले व प्रवक्ते गौरव भाटिया याचे समन्वयक आहेत. नड्डा यांनी काल (शनिवारी) रशियासह सात दूतावासांच्या प्रमुखांशी भाजप मुख्यालयात चर्चा केली. येत्या ११ व १३ जूनलाही अनुक्रमे युरोपीय व आखाती देशाच्या राजदूतांबरोबर अशाच बैठका घेण्यास नड्डा यांना सांगण्यात आले आहे. भारतात प्रत्येक धर्माचे स्वातं६य व सन्मान अबाधित राखला जातो या सूत्राभोवती नड्डा यांनी आपले विचार मांडले. त्यांनी आतापावेतो ३१ देशांच्या राजदूतांबरोबर चर्चा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com