Uttar Pradesh Politics : अहिल्यादेवींवरून उत्तर प्रदेशात राजकारण; मतांसाठी नावाचा वापर करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा
Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात ओबीसी समाजाचे मन जिंकण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. मंदिर जीर्णोद्धारापासून ते महिला सशक्तीकरणापर्यंत त्यांच्या कार्याचा उल्लेख होत आहे.
लखनौ : इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तींची आठवण कशी आणि कधी काढायची, हे सर्वच राजकारण्यांना चांगले ठाऊक असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे त्यापैकीच एक नाव. विविध राजकीय पक्षांमध्ये अचानक त्यांच्याबद्दल भक्तिभाव दाटून आला आहे.