महंमद पैगंबर व इस्लाम धर्म यांच्याबद्दल कथितरीत्या अपशब्द वापरल्याब प्रवक्त्या तक्रार दाखल

फॅक्ट चेकर महंमद जुबैर यांच्यार आरोप केले
BJP Spokesperson Nupur Sharma
BJP Spokesperson Nupur Sharmaesakal
Updated on

नवी दिल्ली : प्रेषित महंमद पैगंबर व इस्लाम धर्म यांच्याबद्दल कथितरीत्या अपशब्द वापरल्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सातत्याने धमक्या मिळत असल्याची तक्रार पुन्हा केली आहे. शर्मा यांच्याविरूध्द पोलिसांत आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी पैगंबरांबद्दल अनुद्गार काढल्याचा आरोप असून आपले शब्द काटछाट करून विकृत पध्दतीने समाज माध्यमांवर ट्विट करण्यात आल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी फॅक्ट चेकर महंमद जुबैर यांच्यार आरोप केले आहेत. जुबैर यांनी आपले म्हणणे काटछाट करून समाज माध्यमांवर पसरविल्याचा शर्मा यांचा आरोप आहे तर जुबैर यांनी सारे आरोप नाकारले आहेत. जुबैर चालवत असलेल्या आॅल्ट न्यूजद्वारे आपल्याविरूध्द सातत्याने भडक वक्तव्ये केली जात आहेत असे शर्मा यांनी म्हटले.

हा वाद सुरू झाल्यापासून आपल्याला, आपल्या बहिणीला व आपल्या आईवडीलांना शिरच्छेदाच्या व बलात्कार करून हत्या करण्याच्या धमक्या मिळत असल्याचे सांगून त्यांनी दिल्ली पोलिसांकडे पुन्हा तक्रार केली आहे. आपल्याला व आपल्या कुटुंबीयांच्या जिवालाकाहीही धोका झाला तर जुबैर हेच त्यसाठी जबाबदार असतील असे शर्मा यांनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीतही म्हटले आहे. याबाबत आजपर्यंतचे फोन व मेसेजेस आपण पोलिसांच्या ताब्यात दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्याविरूध्द रजा अकादमीसह हैदराबाद व इतर ठिकाणच्या काही धार्मिक संघटनांनीही पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी शर्मा यांना मिळणाऱया धमक्यांचे पुरावे मिळताच कारवाई सुरू केली आहे. शर्मा व कुटुंबीयांना अद्याप पोलिस संरक्षण देण्यात आलेले नसले तरी सायबर शाखेच्या अहवालानंतर दिल्ली पोलिस त्यांना सुरक्षा पुरवू शकतात असे सांगितले जाते. भाजपने शर्मा यांचे ठाम समर्थन केले असून हा देश राज्यघटनेनुसार चालतो व कोणालाही त्यांच्या शिरच्छेदाचा फतवा काढण्याचा अधिकार नाही. शर्मा यांच्याविरूध्द पोलिसांकडे तक्रारी करण्याचा मार्ग मोकळा असल्याचेही भाजपने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com