'चाय पे चर्चा'नंतर आता भाजपची 'नमो पंचायत' मोहीम; शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने (भाजप) गुजरातमधील शेतकरी आणि ग्रामीण भागातील आपली ताकद वाढवण्यासाठी 'नमो पंचायत' आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. (BJP news in Marathi)

Narendra Modi
मोदींपाठोपाठ CM योगीही करणार न्यूयॉर्क-बँकॉकमध्ये 'रोड शो'; युपी सरकारचं नियोजन

एका महिन्यात सुमारे 14 हजार गावांमध्ये नमो पंचायत होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्र भाजप किसान मोर्चाकडे असणार आहे. याआधी भाजपकडून २०१४ निवडणुकीच्या वेळी चाय पे चर्चा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे नमो पंचायतच्या माध्यमातून भाजप गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आपलं पाठबळ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.

गुजरातमधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात भाजपची कामगिरी खराब झाली होती. पक्षाला ग्रामीण भागातील 143 जागांपैकी केवळ 64 जागा जिंकता आल्या होत्या. त्याचवेळी भाजपने शहरी भागातील 39 जागांपैकी 34 जागा जिंकल्या होत्या.

सूत्राने सांगितले की, यावेळी पक्ष विशेषतः ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत सुमारे 14 हजार गावांमध्ये 'नमो पंचायत' करण्यात येणार आहे. या दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल.

Narendra Modi
Srinidhi Shetty : फोटो पाहून तुम्हालाही व्हावं वाटेल 'केजीएफ'मधला यश!

पक्षाच्या सूत्राने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्याने गायींवर आधारित नैसर्गिक शेतीबद्दल बोलत आहेत. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अनेक प्रकारची मदतही दिली जात आहे. गाईंवर आधारित नैसर्गिक शेतीचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यासाठी भाजप किसान मोर्चाने बिहारमधील गंगेच्या काठापासून आपल्या प्रचाराची सुरुवात केली होती. भाजप किसान मोर्चाच्या वतीने 'नमो पंचायत'मध्ये गाईवर आधारित नैसर्गिक शेतीची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com